जळगाव, राजकीय

ग.स. सोसायटीच्या अध्यक्षपदी मनोज पाटील; उपाध्यक्षपदी शामकांत भदाणे ( व्हिडीओ )

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

जळगाव प्रतिनिधी । सरकारी कर्मचार्‍यांची पतसंस्था अर्थात ग.स. सोसायटीच्या अध्यक्षपदी आज मनोज पाटील तर उपाध्यक्षपदी शामकांत भदाणे यांची निवड करण्यात आली.

Akshay Trutiya

ग.स. सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. यात अध्यक्षपदासाठी मनोज पाटील तर उपाध्यक्षपदासाठी शामकांत भदाणे यांची निवड करण्यात आली. आपण सर्व संचालकांना सोबत घेऊन आणि ग.स. च्या सर्व सदस्यांच्या हितासाठी काम करणार असल्याची ग्वाही नूतन अध्यक्ष मनोज पाटील यांनी दिली. तर शामकांत भदाणे यांनी सोसायटीची उज्ज्वल परंपरा कायम राखण्यासाठी सर्व संचालक आणि सभासदांच्या मदतीने प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली. दरम्यान, या निवडीत सहकार गटातच फुट पडल्याचे दिसून आले. खरं तर आधीच उदय पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी समोर आले होते. तथापि, ऐन वेळी मनोज पाटील यांनी अर्ज दाखल करून अवघ्या एका मताचे विजय संपादन केला.

पहा : ग.स. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा व्हिडीओ.

Leave a Comment

Your email address will not be published.