जळगाव, राजकीय

पंतप्रधान मोदींच्या सभेला जाण्यासाठी मोफत बससेवा

शेअर करा !

modiinterview19042019 0

जळगाव, प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली महाजानादेश सभा उद्या रविवार दिनांक १३ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता विमानतळ समोरील भारत फोर्जच्या खुल्या मैदानावर जाहीर सभा होत आहे. येथे जाण्यासाठी भारतीय नमो संघातर्फे मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

काश्मीर येथील ३७० वे कलम रद्द केल्या बद्दल व प्रधानमंत्री नरेद्र मोदि यांचे स्वागतासाठी भारतीय नमो संघ जळगावतर्फे सभेला उपस्थित राहण्यासाठी मोफत बस सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. व या जाहीर सभेला यशस्वी करण्यासाठी जळगाव शहरातील राष्ट्रप्रेमी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय नमो संघाचे प्रदेश अध्यक्ष अनिल पगारिया यांनी केले आहे. जळगाव शहरातील ९ मंडलांमध्ये शिवाजी नगर, पिंप्राळा, मेहरूण, रामेश्वर कॉलनी, महाबळ जुने जळगाव शनी पेठ सुप्रीम कॉलनी अयोध्या नगर, दादावाडी, रामानंद नगर, शिव कॉलनी, हरिविठ्ठल नगर, हुडको, गणेश कॉलनी, रिंग रोड, तांबापुरा, सिंधी कॉलनी, नवी पेठ या परिसरातून सकाळी ९ वाजेपासून मोफत वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी या महाजानदेश सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन अनिल पगारिया, अजय जोशी, प्रियांका सोनी, मनीष जोशी, वैशाली पाटील, दिनेश बोरा, सुनील श्रीश्रीमाळ, विक्की पिपरिया, सुरज पाठक, डॉ. सुरेश सूर्यवंशी, किशोर भंडारी, निशिकांत मंडोरा, शागीरभाई चीत्तलवाला, अभिषेक पगारिया सचिन बाविस्कर यांनी केले आहे.