क्राईम, राजकीय, राष्ट्रीय

विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणी माजी मंत्री चिन्मयानंद यांना अटक

शेअर करा !
Swami Chinmayanand
 

शाहजहांपूर (वृत्तसंस्था) माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते स्वामी चिन्मयानंद  यांना विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, चिन्मयानंदला अटक न झाल्यास आत्महत्या करण्याची धमकी पीडित मुलीने दिली होती. त्यामुळे हे प्रकरण चिघळणार असे दिसताच चक्रे फिरली आणि अखरे अटकेची कारवाई झाली.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

 

शहाजहांपूर येथील आश्रमातून विशेष तपास पथकाने (एसआयटी) आज सकाळी चिन्मयानंद यांना ताब्यात घेतले. शहाजहांपूर येथे चिन्मयानंद यांचे लॉ कॉलेज आहे. याच कॉलेजातील एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा व तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप चिन्मयानंद यांच्यावर आहे. चिन्मयानंद निर्दोष असल्याचे सांगत त्यांचे पाठीराखे रस्त्यावर उतरले होते. मात्र, पीडित विद्यार्थिनीनेही माघार न घेता या संदर्भातले अनेक व्हिडिओ जाहीर केले होते. त्यानंतर चिन्मयानंद यांना अटक करण्यासाठी योगी सरकारवर दबाव वाढला होता.