क्रीडा, राज्य

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी फुटबॉलच्या मैदानावर

शेअर करा !

Indian cricket captain Mahendra Singh Dhoni on the football field

 

मुंबई प्रतिनिधी । विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर क्रिकेटच्या मैदानाबाहेर असलेला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी नुकताच फुटबॉलच्या मैदानावर उतरला होता. महेंद्रसिंह धोनी फुटबॉलच्या मैदानात काय पराक्रम गाजवणार हे पाहण्यासाठी चाहत्यांसह फुटबॉलप्रेमींनी गर्दी केली होती.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

मुंबईत सोमवारी हा सामना पार पडला. धोनीच्या ब्रँडिंगचं काम पाहणाऱ्या ‘हृति स्पोर्ट्स’नं या सामन्यातील काही क्षणचित्रे शेअर केली आहेत. यात धोनी आणि पेस फुटबॉलचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत काही अन्य क्रिकेटपटूही दिसत आहेत.
इंग्लंडमध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषकानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. २०१४ साली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजूनही खेळतो आहे. मात्र, वर्ल्डकपनंतर झालेला वेस्ट इंडिज दौरा व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतही त्याचा सहभाग नव्हता. बांगलादेशच्या विरुद्ध होणाऱ्या आगामी टी-२० मालिकेतही धोनी नसेल. मात्र, डिसेंबरमध्ये वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्यादरम्यान होणाऱ्या सामन्यात धोनीला पुन्हा संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.