राज्य

माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांचा आज वाढदिवस

शेअर करा !

modi and advani

 

नवी दिल्ली प्रतिनिधी । देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचा आज 92 वा वाढदिवस आहे. भाजपचे लोहपुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिग्गज नेत्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels
  • FB IMG 1572779226384

अडवाणी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करुन आडवाणी हे बुद्धिमान, दिग्गज राजकारणी आणि देशातील सर्वांत सन्मानित नेत्यांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. एकापाठोपाठ एक ट्विट करुन त्यांनी अडवाणींचे कौतुक केले. ते म्हणाले, नागरिकांना सशक्त करण्यासाठी लालकृष्ण आडवाणी यांचे योगदान भारत सदैव स्मरणात ठेवेल. जन्मदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या दीर्घायुष्याबाबत प्रार्थना करतो. असेही मोदी म्हणाले आहे. लालकृष्ण अडवाणी यांचा निवासस्थानी भाजप अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा हेही उपस्थित होते.