अर्थ, राज्य, राष्ट्रीय

सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डीझेलचे दर वाढले

शेअर करा !

petrol

मुंबई (वृत्तसंस्था) आज सलग चौथ्या दिवशी देशभरात पेट्रोल आणि डीझेलचे दर वाढले आले आहेत. यानुसार मुंबईत पेट्रोलचे दर शुक्रवारी 34 पैशांनी वाढले.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

 

दिल्लीमध्ये शुक्रावारी पेट्रोल ३५ पैशांनी वाढून प्रति लिटर ७३.०६ रूपये झाले आहे. तर डिझेल २८ पैशांनी वाढून ६६.२९ रूपये झाले आहे. सौदी अराम्कोकडून होणाऱ्या खनिज तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. मुंबईमध्ये मंगळवार, बुधवार आणि गुरूवारी अनुक्रमे प्रति लिटर १४, २५ आणि २९ पैशांनी पेट्रोल महागलं होते. तर डिझेल प्रतिलिटर १५, २४ आणि १९ रूपयांनी महागले होते. सौदी अरेबियाची आणि जगातील सर्वात मोठी तेल कंपनी आरामकोवर हौती बंडखोरांच्या हल्ल्यानंतर या कंपनीने 50 टक्के उत्पादन बंद केले. त्याचाच फटका आंतरराष्ट्रीय बाजारासह भारताला देखील बसला आहे.