चाळीसगाव, राजकीय

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चाळीसगाव येथे भेट

शेअर करा !
वाचन वेळ : 2 मिनिट

ajit pawar in chalisgaon

चाळीसगाव प्रतिनिधी । माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज चाळीसगाव येथे भेट देऊन एका विवाहाला हजेरी लावत काही मान्यवरांच्या घरी भेट दिली.

Akshay Trutiya

याबाबत वृत्त असे की, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज चाळीसगावात धावती भेट दिली.सकाळी १० वाजता माजी आमदार राजीव देशमुख यांच्या राजगड निवासस्थानी त्यांचे आगमन झाले. शहरातील विवीध ठिकाणी त्यांनी भेटी देवून तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधून मालेगावकडे प्रस्थान केले. अजितदादा पवार यांनी आज सकाळी हिरापूर रोड येथील सुयश लॉन्स येथील लग्नास उपस्थिती दिली.राहुरीचे माजी आमदार तथा शिर्डी साई संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांचा पुतण्या अनिकेत आणि तालुक्यातील रांजणगाव येथील रमेश चव्हाण यांची कन्या कल्याणी यांच्या विवाहप्रसंगी पवार यांनी पुर्णवेळ उपस्थिती दिली.यावेळी व्यापारी देखरेख संघाचे अध्यक्ष प्रदीपदादा देशमुख, माजी आमदार राजीव देशमुख यांच्यासह आप्तेष्ट व मित्र परिवार उपस्थित होते. यानंतर अजित पवार यांनी उद्योजक किरण फकीरराव देशमुख यांच्या घरी कौटुंबिक भेट देत परिवारातील सदस्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्व.फकीरराव देशमुख यांच्याशी पवार परिवाराचा असलेल्या दृढ संबंधाना उजाळा दिला तर तालुक्यातील उद्योग धंद्याविषयी सखोल चर्चा केली. यावेळी त्यांनी खान्देशी फळांचा आस्वाद घेतला. श्रीमती सुशीला देशमुख,किरण देशमुख,छाया कदम,स्वाती देशमुख,तेजस्विनी सुर्यवंशी आदी कुटुंबातील सदस्यांसोबत त्यांनी संवाद साधला.

माजी आमदार प्रा.साहेबराव घोडे यांचे बंधू पंचायत समितीचे माजी सभापती सुर्यभान घोडेस्वार यांचे नुकतेच दु:खद निधन झाले. या पार्श्‍वभूमिवर, अजित पवार यांनी घोडे परिवाराची सांत्वन भेट करण्यासाठी शाहू नगर येथील त्यांच्या घरी द्वारदर्शनपर भेट दिली. याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राठोड,माजी नगरसेवक संजय घोडेस्वार, युवा नेते अमोल घोडेस्वार, दडपिंप्रीचे माजी सरपंच तकतसिंग पवार,गव्हर्नमेंट काँन्ट्रॅक्टर प्रशांत देशमुख,नगरसेवक रामचंद्र जाधव, जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील,भगवान पाटील, दिपक पाटील, शाम देशमुख,सूर्यकांत ठाकूर,जगदीश चौधरी,योगेश खंडेलवाल,स्वप्निल कोतकर,प्रताप भोसले,शुभम पवार,अजित सोमवंशी आदी उपस्थित होतेे.

ajit pawar in chalisgaon1

Leave a Comment

Your email address will not be published.