क्राईम, चाळीसगाव

अपघातात दोघे जागीच ठार; देवळी-आडगाव फाट्याजवळील घटना

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

apghat

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगावहून मालेगावकडे दोघेजण जात असतांना तालुक्यातील देवळी-आडगाव फाट्याजवळ अपघात झाल्याने दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. मयत झालेले दोघे हे हिरापूर रोड चाळीसगाव येथील रहिवाशी आहे. दरम्यान यांना अज्ञात वाहनाने धडक दिली की एखद्या झाडाला येवून धडकले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी पोलीसांची धाव घेतली आहे.

  • NO GST advt 1
  • linen B

याबाबत माहिती अशी की, वैभव देशमुख (गायकवाड) आणि अदित्य मधुकर वरसाळे दोघे रा. हिरापूर रोड, चाळीसगाव हे दोघे कामानिमित्त मोटारसायकलने मालेगाव येथे जात असतांना देवळी आडगाव फाट्याजवळ झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले. मयत वैभव देशमुख आहे जिओ मोबाईल कंपनीत कामाला आहे तर अदित्य वरसाळे यांचे मोबाईल रिपेअरींगचे चाळीसगाव दुकान आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.