रावेर

रावेर परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का ( व्हिडीओ )

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

untitled 13 1545551199

रावेर प्रतिनिधी । तापी खोर्‍यातील काही गावांमध्ये आज सायंकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे वृत्त आहे. भूकंपाची तीव्रता अजून समजले नसून प्रशासन याचा शोध घेत आहे.

  • NO GST advt 1
  • linen B

याबाबत वृत्त असे की, रावेर तालुक्यातील काही गावांमध्ये ७.४० वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. यामुळे काही ठिकाणी गोंधळ निर्माण झाला. रावेर शहरासह विवरा आणि काही गावांमध्ये हे धक्के जाणवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत अद्याप प्रशासनाने काहीही माहिती दिली नसल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. रावेर शहर, आहेरवाडी, निंबोलं, मोरगाव, निंभोरा, बोरखेडा, खानापुर, अटवाडे, रसलपुर या गावांसह अनेक गावांना रावेर परिसराला सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रावेर शहरातील चौधरी नगर, सोनू पाटील, नगर नाला भाग, शिवाजी चौक भागाला देखील भूकंपाचे धक्के जाणवले. भयभीत होऊन काही कॉलनी लोक बाहेर आले आहे. याबाबत तहसीलदार देवगुणे यांना विचारण केली असता त्यांना अधिकारी भुकंपाबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

पहा : रावेर शहरातील भूकंपाबाबत काय म्हणतात नागरिक ?

Leave a Comment

Your email address will not be published.