एरंडोल, सामाजिक

एरंडोलकर सरसावले पुरग्रस्तांच्या मदतीसाठी (व्हिडीओ)

शेअर करा !

erandol news

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल येथे मैत्री संघ फाऊंडेशनच्या माध्यमातून युवकांनी कोल्हापूर, सांगली, सातारा येथील महापुरातील पीडितांसाठी पूरग्रस्त सहाय्यता अभियानांतर्गत रा.ती.काबरे विद्यालयासमोर 12 ते 15 ऑगस्ट 2019 दरम्यान शिबिराचे आयोजन केले आहे.

  • advt atharva hospital
  • advt tsh 1
  • Online Add I RGB

सागर महाजन, पंकज पाटील, पियुष चौधरी, शुभम महाजन, साहिल पिंजारी, निखिल वाणी, आदित्य पाटील, करण पाटील, मनोज महाजन, विनीत पाटील या युवकांनी सवेदनांचे दर्शन घडविले आहे. या उपक्रमाला शहरातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून धान्य, कपडे, व रोख पैसे या प्रकारची मदत मिळत आहे. अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंची मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.