एरंडोल, सामाजिक

एरंडोलच्या जय श्रीराम प्रतिष्ठानची अनोखी दिवाळी साजरी

शेअर करा !

Erandol news

एरंडोल प्रतिनिधी । येथील जय श्रीराम प्रतिष्ठानतर्फे सालाबादाप्रमाणे जय श्रीराम प्रतिष्ठानतर्फे दुर्लक्षित व गोर गरीब लोकांसोबत सामाजिक जाणिवेतून व “निस्वार्थपणे गरजूंची सेवा केल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच आपले खरे बक्षीस असते” ही भावना अंगीकारून दिवाळी साजरी केली.

  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels
  • FB IMG 1572779226384

जय श्रीराम प्रतिष्ठानच्या या अनोख्या उपक्रमाची सुरुवात गेल्या ७ वर्षांपासून केली आहे. प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी शहरातील जहांगिरपुरा परिसरातून घरोघरी जाऊन प्रत्येक घरातून दिवाळीचा फराळ थोड्या थोड्या प्रमाणात गोळा केला व तो गोळा करून त्याचे विविध पाकिट बनवले. ते पाकीट गरीब व दुर्लक्षित लोकांना त्यांच्या पड्यांवर व वस्तीवर जाऊन दिले.

एरंडोल शहरातील जयप्रकाश वाडी या भागात दिवाळीचे फराळाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी उपनागराध्यक्षा छाया दाभाडे, जयश्री राजेश महाजन, अमित पाटील, गुजर समाज अध्यक्ष गोपाल पाटील, गोरख महाजन, छोटू चौधरी (भगत) सिद्धिविनायक डेव्हलपर्स या मान्यवरांच्या हस्ते लहान मुलांना व महिलांना फराळाचे वाटप करण्यात आले. सदर उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी उपाध्यक्ष अमर महाजन, सचिव प्रदीप फराटे, ऋषिकेश महाजन, राजेंद्र नागो पाटील, ज्ञानेश्वर पाटील, आबा कोळी, बाळू पाटील, अवि जाधव , सुधाकर महाजन ,भानुदास आरखे.,भरत मराठे, कुस्तीपटू कु. योगेश्वरी मराठे, अनंत महाजन, अमित पाटील ,आबा महाजन, कृष्णा पाटील, धीरज पाटील, सर्वांनी परिश्रम घेतले.