राजकीय, राज्य

…तर नाथाभाऊंना विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची संधी !

शेअर करा !

eknath khadse

मुंबई प्रतिनिधी । सरकारला कोंडीत पकडण्यासाठी भाजपने रणनिती आखली असून यासाठी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • spot sanction insta
  • Sulax 1
  • advt tsh flats

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने एकनाथराव खडसे यांना तिकिट नाकारले होते. त्यांच्या कन्येला मुक्ताईनगरातून भाजपची उमेदवारी मिळाली असली तरी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या पराभवात भाजपमधील एका गटाचा हात असल्याचे उघडपणे दिसून आले आहे. दरम्यान, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील राजकीय चित्र बदलून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने एकत्रीतपणे सत्ता स्थापन केल्याने भाजपला आता प्रखर विरोधकाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर निवड करण्यात आली असून त्यांनी विशेष अधिवेशनात पक्षाच्या आक्रमक भूमिकेची चुणूक दाखवून दिली आहे. तथापि, विधानपरिषदेत मात्र मातब्बर नेत्यांच्या अभावी भाजपची अडचण होण्याची शक्यता आहे.

आधी विधानपरिषदेत असणारे चंद्रकांत पाटील हे आता विधानसभेत गेले आहेत. तर सत्ताधार्‍यांकडे विधानपरिषदेत एकापेक्षा एक सरस नेते आहेत. यात शिवसेनेचे अनिल परब, रामदास कदम आणि दिवाकर रावते यांच्यासह काँग्रेसचे भाई जगताप, प्रा. जनार्दन चांदुरकर, शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, तर राष्ट्रवादीचे हेमंत टकले, विद्या चव्हाण, शेकापचे जयंत पाटील आणि लोकभारतीचे कपिल पाटील आदींसारख्या एकापेक्षा एक मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. यामुळे सरकारला कोंडीत पकडायचे झाल्यास एकनाथराव खडसे यांच्यासारख्या अनुभवी, प्रचंड अभ्यासू आणि अत्यंत आक्रमक अशा नेत्यांची आवश्यकता आहे. यामुळे त्यांना विधानपरिषदेवर घेऊन विरोधी पक्षनेतेपद दिले जाईल अशी शक्यता आहे. खरं तर, या पदासाठी पंकजा मुंडे यांचेही नाव चर्चेत असले तरी आक्रमकपणात नाथाभाऊ सरस असल्याने त्यांना हे पद मिळू शकते. असे झाल्यास त्यांची नाराजी दूर होणार असून सत्ताधार्‍यांना वेसणदेखील घालणे शक्य असल्याने पक्षश्रेष्ठी त्यांच्या नावाचा विचार करू शकतात.