अर्थ, राजकीय, राष्ट्रीय

देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत : मनमोहन सिंग

शेअर करा !

 

1557976596 manmohan singh
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये गेल्या वर्षभरात होणारा नुकसानाचा आकडा वाढतच असल्याचे लक्षात येत आहे. फक्त आर्थिक धोरणात बदल करून देशाची अर्थव्यवस्था सुधारणार नाही. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक असल्याचे देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

  • Sulax 1
  • advt tsh flats
  • spot sanction insta

 

अर्थव्यवस्थेविषयीच्या एका संमेलनात भाषण करतेवेळी त्यांनी आपले विचार मांडले. देशाच्या एकंदर अर्थव्यव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त करत आपल्या समाजाची स्थितीच अधिक चिंताजनक असल्यामुळे हेच अर्थव्यवस्थेच्या अनिश्चितीकरणाचे प्रमुख कारण असल्याचं ते म्हणाले. कृषी आणि इतरही काही महत्त्वाच्या क्षेत्रांना या साऱ्याचा फटका बसल्यामुळे चालू वर्षातील दुसऱ्या तिमाहीत जीडीपी म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर हा ४.५ टक्क्यांवर राहिला आहे.