Cities, क्राईम, पाचोरा

अवैध धंद्याबाबतची माहिती थेट सचिन कदम साहेबांना द्या !

शेअर करा !

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील कोणत्याही अवैध धंद्याबाबतची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांना देण्याचे आवाहन त्यांनी स्वत: केले असून यामुळे नंबर दोन वाल्यांचे धाबे दणाणले आहे.

  • Sulax 1
  • advt tsh flats
  • spot sanction insta

याबाबत वृत्त असे की, पाचोरा येथील प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांनी गेल्या महिन्याभरापासून अवैध व्यावसायिकांविरोधात आघाडी घेतली आहे. त्यांनी तालुक्यात ठिक-ठिकाणी अवैध दारू, सट्टा क्लब, पत्ता क्लब, अवैध वाहतूक अशा विविध अवैध धंदेवाईकावर छापा टाकून एकच धडाका लावला आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यावर अवघ्या दोन महिन्यांत केलेल्या कार्यवाहींमुळेे अवैध धंदेवाल्यांचे धाब दणाणले आहेत. तरी अनेक अवैध व्यवसायिक पोलिस कारवाईपासून दूर राहण्यासाठी विविध शक्कल लढवत असल्याचे उघड झाले आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता खुद्द सचिन कदम यांनी पाचोरा तालुक्यात कुठेही अवैध धंदे सुरू असल्यास ०२५६९६- २४०१३३ या लँडलाईन क्रमांकासह स्वत: त्यांना ७७९८०१७७०८ या क्रमांकावर माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही अवैध व्यवसायाबाबत माहिती देणार्‍याचे नाव गोपनीय ठेवले जाऊन संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही स्वत: कदम यांनी दिली आहे.