चाळीसगाव, सामाजिक

मल्हार गड येथे सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे दसरा महोत्सव उत्साहात

शेअर करा !

malhar gad

चाळीसगाव प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या कन्नड घाटातील मल्हार गड येथे सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे यंदाही दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

प्रथम मल्हार गडावर ध्वजस्तंभ उभा करून मल्हार देवाची तळी भरण्यात आली. यानंतर गडावरील बुरूज तटांना फुलांच्या माळा बांधून गड पूजन करण्यात आले. यानंतर गडावर भंडारा उधळण्यात आला. यावेळी मल्हार गड महोत्सवात महिला व पुरुष सदस्य मोठ्या संख्येने आपली उपस्थितीत दिली.