नंदुरबार

दहशतवादाचा पुतळा दहन करताना शहाद्यात तरुणाचा चेहरा भाजला

शेअर करा !

नंदूरबार (प्रतिनिधी) जिल्ह्यातील शहादा येथे (सोमवार) सकाळी दहशवादाचा प्रतिकात्मक पुतळा दहन करताना एक तरुण भाजल्याची घटना घडली. राजी इलियास मेमन (वय-43) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

  • advt tsh flats
  • Sulax 1

अधिक माहिती अशी की, शहरातील मेमन कॉलनीत पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सकाळी अकरा वाजेच्या सुमारास निषेध करण्यात आला. दहशतवादाचा प्रतिकात्मक पुतळा जाळून मुस्लिम नागरिकांनी हल्ल्याचा निषेध केला. त्यावेळी पुतळा दहन करताना राजी याच्या हातात पेट्रोलची बाटली होती. पुतळ्याला आग लावताच राजीच्या हातात असलेल्या पेट्रोलच्या बाटलीनेही पेट घेतला, त्यामुळे त्याच्या दाढीचे केसही पेटले. त्यात राजीचा चेहरा भाजला असून त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, राजी इलियासच प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याचे कळते.