बोदवड, सामाजिक

बोदवड न.प. कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने कामांचा खोळंबा

शेअर करा !

WhatsApp Image 2019 07 11 at 7.54.49 PM

बोदवड, प्रतिनिधी | येथील नगर पंचायतीमध्ये १७ कर्मचारी असतांना कार्यलयीन वेळेत केवळ तीन कर्मचारी हजर असल्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारी ४.०० वाजेच्या सुमारास उघडकीस आला. दरम्यान, नगराध्यक्ष मुमताजबी बागवान यांनी कर्मचारी एकदा जेवणाच्या वेळेत घरी गेले की, कार्यालयात येत नसल्याचा गंभीर आरोप केला आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

नगर पंचायतीमधून नागरिकांना घरकुल प्रस्ताव, जन्म नोंदी, उतारे, नाहरकत, परवानगी दाखले, अश्या प्रकारची कागदपत्रे शासकीय कामासाठी लागत असतात. परंतु, कर्मचारीच त्यांच्या टेबलावर उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना त्यांच्या कामांसाठी नगरपंचायत कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. कार्यलयाची वेळ ही सकाळी ९.४५ ते सायंकाळ ५.४५ अशी असतांना दुपारी ४.०० वाजेच्या सुमारास केवळ तीन कर्मचारी यात क्लार्क आशा मनोज छपरिबन, गणेश हिवरळे, शिपाई देविदास अमोदकर हे हजर होते. मुख्याधिकारी यांच्यासह १३ कर्मचारी कार्यालयात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. एवढेच नव्हे तर ‘लाईव्ह ट्रेंड्स न्युज’च्या प्रतिनिधीने नगराध्यक्ष मुमताजबी बागवान यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कर्मचाऱ्यांची जेवणाची सुटी ही २ ते २.३० वाजेपर्यंत असते कर्मचारी जेवणासाठी घरी गेल्यावर कार्यालयात येतच नाहीत. त्यामुळे कामकाजाचा खोळंबा होत आहे. कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक राहिलेला नाही असेही सांगितले. न.प. मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.