क्राईम, जळगाव

दुचाकी कारवर आदळल्याने तरूण जागीच ठार

शेअर करा !

tarun apghat

जळगाव प्रतिनिधी । दुचाकी कारला जोरदार आदळल्याने दुचाकीधारक जागीच ठार झाल्याची घटना आयटीआय कॉलेजच्या समोर रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत रामानंद नगर पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या अपघातात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला आहे.

advt tsh 1

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश बापु पाटील वय-30 रा. अयोध्या नगर हा विद्यूत सहाय्यक म्हणून नोकरीवर होता. मित्राला शिवकॉलनीत सोडल्यानंतर सोडल्यानंतर पल्सर क्रमांक (एमएच 19 एएस 7710) ने घरी परतत असतांना समोरून भरधाव येणारी कार (एमएच 19 सीयु 8921) वर आदळल्याने अविनाश जागीच ठार झाला. तर कार आणि दुचाकीचो पुर्ण चुराडा झाला होता. हा अपघात रात्री 12 वाजेच्या सुमारास आयटीआय कॉलेजजवळ घडला. दरम्यान आज सकाळी जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेबाबत रामानंद नगर पोलीसात नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास विनोद शिंदे करीत आहे.

नातेवाईकांचा आक्रोश
महावितरणमध्ये विद्युत सहायक म्हणून नोकरीला दोन वर्षांपुर्वी लागला होता. मुळ रहिवाशी धुळे जिल्ह्यातील मोहाडी येथील रहिवाशी असल्याने अयोध्या नगरात भाड्याच्या घरात राहत होता. मयत अविनाशच्या पश्चात आई, वडील व एक बहीण आहे. एकुलता एक मुलगा असल्याने बहिण व आई-वडीलांनी अविनाशचा मृतदेह पाहताच हंबरडा फोडला होता.