पाचोरा

विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये डॉ. शरद देशमुख यांची सेवा

शेअर करा !
वाचन वेळ : 2 मिनिट

dr sharad deshmukh पाचोरा प्रतिनिधी । येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विख्यात लिव्हर स्पेशालिस्ट डॉ. शरद देशमुख हे आठवड्यातील एक दिवस रूग्णांसाठी उपलब्ध असून यामुळे परिसरातील रूग्णांना सुविधा मिळणार आहे.

  • vignaharta
  • new ad
  • Online Add I RGB
  • advt tsh 1

विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये जागतिक दर्जाची उपकरणे, तज्ज्ञ डॉक्टर्स आणि प्रशिक्षीत स्टॉफ आहे. याच्या जोडीला मोठ्या शहरांमधील विख्यात तज्ज्ञ डॉक्टर्सची सेवादेखील येथे नियमितपणे उपलब्ध करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने अपोलो हॉस्पीटलचे सुप्रसिध्द पोटांचे विकार व लिव्हर स्पेशालिस्ट डॉ. शरद देशमुख मंगळवार दिनांक १८ जून रोजी विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटरमध्ये येत आहेत. डॉ. देशमुख हे लिव्हर ट्रान्सप्लांटचे तज्ज्ञ आणि एंडोस्कोपीतील ख्यातप्राप्त डॉक्टर म्हणून ओळखले जातात.

सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे पोटांचे विकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. यामध्ये अगदी अ‍ॅसिडिटीपासून ते अपचन, पोटदुखी, पॅनक्रियायटीसीस, पोटाचा कर्करोग, पोट व आतड्यांमधील अल्सर, वारंवार होणारे जुलाब, गिळण्यास त्रास होणे, उलटी व शौचालयामध्ये रक्त जाणे आदी पोटाच्या विविध विकारांसह लिव्हरचे आजार म्हणजे काविळ, पोटात पाणी कमी होणे, हिपॅटायटीस, लहान मुलामधील लिव्हरचे आजार, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरासिस, यकृत खराब होणे आदींवर डॉ. शरद देशमुख उपचार करतील. यासोबत एण्डोस्कोपी,कोलोनोस्कोपी आदी सुविधादेखील येथे उपब्लध करण्यात आल्या आहेत. याचा परिसरातील रूग्णांनी लाभ घ्यावा. आणि रुग्णांनी उपाशीपोटी तपासणीसाठी यावे असे आवाहन डॉ भूषण मगर व डॉ सागर गरुड यांनी केले आहे.