जळगाव, सामाजिक

डॉ. प्रियांका रेड्डी यांना गोलाणी मार्केटमध्ये श्रद्धांजली (व्हिडिओ)

शेअर करा !

WhatsApp Image 2019 12 04 at 8.49.47 PM

जळगाव, प्रतिनिधी | हैदराबाद येथे घडलेल्या डॉ. प्रियंका रेड्डी बलात्कार व हत्याकांड प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली असून जनमानसात आक्रोश उफाळून येताना दिसत आहे. या घटनेचे पडसाद देशभरात सोबतच राज्यातील नागरिकांमध्ये दिसून येत आहे. डॉ. रेड्डी यांना गोलाणी मार्केटमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन त्यांच्यावरील अत्याचाराचा जाहीर निषेध करण्यात आला.

  • advt tsh flats
  • Sulax 1
  • spot sanction insta

डॉ. प्रियांका रेड्डी बलात्कार व हत्याकांडाच्या घटनेने समाजमन हळहळले असून आपापल्या बहिणी, मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्न प्रत्येक नागरिकांच्या मनात दिसून येत आहे. या अनुषंगाने गोलाणी मार्केट शिवसेना शहर व्यापारी संघटना यांच्यातर्फे गोलाणी मार्केट येथे श्रद्धांजली व जाहीर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यासभेचे आयोजन शहर व्यापारी संघटनेचे पुनम राजपूत तसेच गोलाणी मार्केट शिवसेना शाखेचे अध्यक्ष दीपक कुकरेजा, उपाध्यक्ष गणेश वाणी, मंगेश जोशी, अमोल साळुंखे, अभिजित कदम, आसिफ शेख ,लखन सोनार, लखन कुकरेजा, आकाश अहुजा, मोसिन शेख, दिपेन्द्र सिसोदिया आदींनी केले.