चाळीसगाव, राजकीय

डॉ. कोतकर यांच्या आहिरणी प्रचार गीताची ग्रामीण भागात धूम

शेअर करा !

WhatsApp Image 2019 10 12 at 9.30.03 PM

चाळीसगाव, प्रतिनिधी | निवडणुकीत प्रचारात उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लावण्यात येत असतात. परंतु, चाळीसगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉ. विनोद कोतकर यांच्या प्रचारासाठी बनविलेले आहिरणी गीत विनोद कोतकर शे नेता दमदार व त्याले बनाडू आपला आमदार यावर उस्फूर्तपणे नाचून गाऊन सहभागी होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

ग्रामीण मतदार डॉ. विनोद कोतकर त्यांच्या रॅलीमध्ये मनापासून विनोद कोतकर शे नेता दमदार व त्याले बनाडू आपला आमदार या गाण्यावर ठेका धरून त्यांचे स्वागत करत आहे. तर डॉ. कोतकर यांनी प्रचारासाठी बनवलेल्या अहिराणी गाण्यावर नाचाचा ठेका धरून त्यांना समर्थन देत आहेत. डॉ. कोतकर यांचा आजचा प्रचार दौरा पिलखोड, उपखेड, सेवनगर, मांदुरण्रे, पिंपळवाड, माळसा या भागात झाला. मतदार राजाला एका सुसंस्कृत सेवाभावी उमेदवारास मतदान करावे असे आवाहन त्यांनी करून संपूर्ण प्रचार दौऱ्यात आपली निशाणी फुगा ही बाल गोपाल पासून ते वृद्धांपर्यंत वाटप करून फुगा या चिन्हाला ला मतदान करावे असे आवाहन केले. यावेळी मतदारांनी त्यांचे स्वयंस्फूर्तीने स्वागत करून विजयाचे आश्वासन दिले. डॉ. कोतकर यांचे चाळीसगाव तालुक्यातील आरोग्य क्षेत्रातील तसेच जल व्यवस्थापन व हागणदारी मुक्ती यासाठी असलेले काम सर्वसामान्यांपर्यंत या आधीच पोहोचले असल्याने ग्रामीण भागात त्यांचे मनापासून स्वागत होत आहे.