भडगाव

दिलीप वाघ यांनी जाणून घेतल्या नुकसानग्रस्तांच्या व्यथा

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

dilip wagh pahani

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वादळी वार्‍यासह पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून माजी आमदार दिलीप वाघ यांनी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.

  • advt tsh 1
  • vignaharta
  • Online Add I RGB
  • new ad

तालुक्यातील कोठली, निंभोरा, कनाशी, देव्हारी, बोदरडे,पांढरद, पिचरडे,बातसर इतर ठिकाणी अवकाळी पावसामुळे झालेल्या गारपिटीने व वादळी पावसाने शेतकरी बांधवांचे केळी बागा व शेतखळे यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या सर्व गावांमध्ये माजी आमदार दिलीप वाघ यांनी शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष भेट देऊन झालेल्या नुकसानीने शेतकर्‍यांना दिलासा दिला. आपण आपल्या स्तरावरून प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांना भेटून या नुकसान भरपाईसाठी आवश्यक तेवढे सर्व प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन देऊन शेतकरी बांधवांकरिता नुकसान भरपाई साठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले या वेळी तालुका अध्यक्ष संतोष जाधव, राष्ट्रवादी तालुका कार्यध्यक्ष हर्षल पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील, कृ. उ.बा. चे संचालक दिलीप पाटील यांच्यासह सर्व गावातील शेतकरी बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.