क्रीडा, राज्य

भारतीय संघात पुनरागमन करायचं की नाही, हे धोनीने ठरवायचं – शास्त्री

शेअर करा !

ravi

 

मुंबई प्रतिनिधी । विश्वचषक स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी ‘टीम इंडिया’मध्ये नेमका कधी पुनरागमन करणार, याबाबत सध्या जोरदार चर्चा आहे. ‘भारतीय संघात पुनरागमन करायचं की नाही, हे धोनीने ठरवायचं, असे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी धोनीच्या पुनरागमनावर भाष्य केले.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी याबद्दल सडेतोड मत मांडलं आहे. ‘भारतीय संघात पुनरागमन करायचं की नाही आणि केलं तर कधी करायचं याचा निर्णय धोनीला स्वत:लाच घ्यायचा आहे,’ असं शास्त्री यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ‘विश्वचषक स्पर्धा झाल्यापासून मी एकदाही धोनीला भेटलो नाही. त्यामुळं त्याच्याशी माझी चर्चा झालेली नाही. मात्र, त्याला पुन्हा संघात यायचं असेल तर त्याचा निर्णय तो स्वत:ला घ्यावा लागेल. तस निवड समितीला कळवावं लागेल,’ असं शास्त्री म्हणाले. धोनीला सामावून घेण्याची टीम इंडियाची तयारी आहे का असं विचारला असता रवी शास्त्री म्हणाले, ‘धोनीची गणना नेहमीच भारताच्या महान खेळाडूंमध्ये होईल. एवढंच नाही, महान खेळाडूंच्या यादीत तो खूप वरच्या स्थानी असेल. मात्र, सध्याचं विचाराल तर धोनीनं आधी खेळायला सुरुवात करायला हवी. त्यानंतरच पुढील गोष्टींचा विचार करता येईल. मात्र, त्यानं पुन्हा खेळायला सुरुवात केलेय असं मला वाटत नाही.’