क्राईम, जळगाव

धानवड येथे विजेच्या धक्क्याने गायीचा मृत्यू

शेअर करा !

electricshock

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील धानवड येथे खळवाडीत उभ्या असलेल्या गाईला विद्यूत तारेचा स्पर्श झाल्याने गायीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात याबाबत नोंद करण्यात आले.

  • FB IMG 1572779226384
  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

याबाबत माहिती अशी की, गुरुवारी 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 ते 9 वाजेच्या दरम्यान तालुका भागात पावसाने हजेरी लावली होती. तर काही ठिकाणी वादळी पावसाची सुरुवात झाली होती. त्यामुळे तालुक्यातील धानवड येथे विद्युत प्रवाहाच्या तारा तुटून पडल्या त्या त्याचवेळी गावातील रामचंद्र नथू पाटील (वय 57) रा. धानवड यांच्या मालकीची गाय आवाजाने बीथरल्याने मागे सरकले असता विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारेला स्पर्श झाल्याने गाईचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोहेकॉ संतोष सोनवणे हे पंचनाम्याचे काम सुरू होते. एमआयडीसी पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.