चोपडा, सामाजिक

धानोऱ्यात ‘पाणी आडवा पाणी जिरवा’बाबत ग्रामस्थांची चर्चा

शेअर करा !
वाचन वेळ : 2 मिनिट

dhanora news

धानोरा प्रतिनिधी । धानोरा येथे लोकसहभागातून ‘पाणी आडवा पाणी जिरवा आणि वृक्षारोपण’ या विषयासह नालाखोलीकरण करण्याबाबत आज शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता ग्रामस्थांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. यावेळी तरूणांनी मोठ्या प्रमाणावर या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

  • vignaharta
  • advt tsh 1
  • Online Add I RGB
  • new ad

पाणी अडवा पाणी जिरवा या मोहीमेसाठी तयारी करण्यात आली आहे. यावेळी लोकसहभागातुन मागील जमा राशी खर्च वाचुन दाखवला तसेच या वर्षातील लोकसहभागातुन जमा झालेल्या रकमेतून खोलीकरण करण्यात आले होते मात्र पुरेसे पाऊस पडला नाही म्हणुन आज सायंकाळी ७ वाजेला चर्चा करण्यात आले. शेतातील बांध दिवसेंदिवस कमी होत असून बांधावरील झाडे तोडणे बंद करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.

यांनी दिली देणगी
सदगुरु मिञ मंडळ गांधी चोक याच्याकडुन १२००० रुपये,
पितांबर सांळुके -११०० रुपये,
महेश महाजन – 1100 रुपये,
राजमल महाजन – ११००,
कबीर खान अब्बास खान – १००० रुपये,
हमिद नादर – ५०० रुपये,
युवराज महाजन – २००० रुपये,
सुरेश सोनवणे – ११०० रूपये

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी उपसभापती माणिकचंद महाजन, ग्रामपंचायत सदस्या कल्पना पाटील, सरपंच कीर्ती पाटील, निसर्ग प्रेमी विलास सोनवणे, अनंत पाटील, संदिप महाजन, प्रदिप महाजन, ईश्वर महाराज, जितु महाजन, युवराज महाजन, रतिलाल पाटील, प्रविण ठाकुर, ग्रामपंचायत सदस्य राजमल महाजन, माजी उपसरपंच पितांबर सांळुके, शेख हमिद नादर, नारायण माळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देविदास महाजन तर आभार प्रशात सोनवणे यांनी केले.