जळगाव, धरणगाव, राजकीय

देवगाव येथे चंद्रशेखर अत्तरदे यांचे महिलांनी केले औक्षण

शेअर करा !

chadrashekhar attares

जळगाव प्रतिनिधी । जळगाव ग्रामीणी मतदार संघाचे अपक्ष उमेदवारी चंद्रकांत अत्तरदे यांचा प्रचारार्थ तालुक्यातील देवगाव येथे प्रचार दौरा काढण्यात आला. यावेळी गावातील महिलांनी जागोजागी चंद्रशेखर अत्तरदे व माधुरीताई अत्तरदे यांचे औक्षण करून फुलहार घालून स्वागत केले.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

जल्लोषात स्वागत
जळगाव ग्रामीण तसेच धरणगाव तालुक्यासाठी शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेले अपक्ष उमेदवार चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे यांचा देवगावात झंझावाती प्रचार दौरा आज १२ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी पार पडला. यावेळी गावातील महिलांनी जागोजागी चंद्रशेखर अत्तरदे व माधुरीताई अत्तरदे यांचे औक्षण करून फुलहार घालून स्वागत केले. यावेळी गावातील सर्व स्तरातून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी गटातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी लक्ष्मण गंगाराम पाटील व यांचे असंख्य कार्यकर्ते तसेच कानळदा-भादली गटातिल शक्ति प्रमुख नरेंद्र पाटील, हितेंद्र सोनवणे, समाधान सोनवणे, गोपाल भंगाळे, बूथ प्रमुख कैलास सपकाळे, मोहित पाटील, नगिनदास पाटील, जगदीश सोनवणे, संतोष भोई, इच्छाराम सपकाळे, मनोज न्हावकर, विनायक सोनवणे, सचिन सोनवणे, जगदीश सोनवणे, विजय सपकाळे आणि देवगावचे सरपंच, ग्रा. प. सदस्य, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.