क्राईम, भुसावळ

एकतर्फी प्रेमातून भुसावळात तरूणीचा खून

शेअर करा !
वाचन वेळ : 2 मिनिट
तरूणीचा खून झालेल्या घरात पाहणी करतांना पोलीस कर्मचारी.

भुसावळ प्रतिनिधी । एकतर्फी प्रेमातून तरूणीवर केलेल्या चाकू हल्ल्यात तिचा खून झाल्याची घटना आज शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे.

  • new ad
  • advt tsh 1
  • Online Add I RGB
  • advt atharva hospital
  • vignaharta

याबाबत मिळालेली माहिती अशी की, लोणारी समाज मंगल कार्यालयाच्या पुढे असणार्‍या हुडको वसाहतीमध्ये राहणार्‍या प्रिती बांगर या युवतीवर प्रवीण इंगळे (रा. खडका चौफुली ) या तरूणाचे एकतर्फी प्रेम होते. मात्र तिने त्याला नकार दिला. यामुळे चवताळलेल्या या तरूणाने आज सायंकाळी तिच्या घरात शिरून चाकूने सपासप वार केले. यात ती गंभीर जखमी झाली. शेजारच्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवीण इंगळे याला ताब्यात घेतले. पोलीस कॉन्स्टेबल जुबेर शेख यांनी प्रसंगावधान राखून आरोपीच्या हातातील चाकू शिताफीने काढून घेतल्याने त्याला अटक करणे शक्य झाले. याप्रसंगी डीवायएसपी गजानन राठोड आणि शहर पोलीस स्थानकाचे निरिक्षक बाबासाहेब ठुबे हेदेखील लागलीच घटनास्थळी दाखल झाले होते.

यानंतर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, उपचार सुरू असतांना तिचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी मृत तरूणीचे मेहुणे राहुल अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रवीण इंगळे या माथेफिरू तरूणास अटक करण्यात आली असून पोलीसांनी त्याच्या विरूध्द खुनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.