क्राईम, जळगाव

दारूड्यांची हाणामारी; दोघे जखमी

शेअर करा !

hanamari jkhami

जळगाव प्रतिनिधी । दारू पिऊन धिंगाणा घालत तिघांनी एकाला मारहाण केली. यात दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास भजे गल्लीत घडली असून दोघांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

  • advt atharva hospital
  • advt tsh 1
  • Online Add I RGB

मिळालेल्या माहितीनुसार, कपील दिलीप बागडे (वय-30) रा. कंजरावाडा हा भजे गल्लीतील हॉटेल अतिथी मध्ये बसला होता. त्याच ठिकाणी मोहनसिंग बावरी, मोनूसिंग बावरी आणि सोबत एकजण असे तिघे जण तिथे दारू पिण्यासाठी आले. यावेळी कपील याने मित्र मायकल आला नाही का? असे विचारणा केल्यानंतर केल्यानंतर या तिघांची कपीलशी वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारी झाले. यात कपील बागडे आणि मोहनसिंग बावरी हे दोघे गंभीर जखमी झाले. यात कपीलच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरण्याचा प्रयत्न देखील झाला असे जखमी कपीलचे नातेवाईकांनी सांगीतले. दोघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले.

जिल्हा रूग्णालयात तासभर गोंधळ
चौघांमध्ये हाणामारी झाल्यानंतर मोहनसिंग बावरी याच्या तोंडाला जबर दुखपत झाली. मोनुसिंग बावरीने आपल्या दुचाकीवरून जखमीस तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर थोड्यावेळाने जखमी कपील देखील दाखल झाला होता. हे बावरीचे नातेवाईक व मित्रांनी तासभर जिल्हा रूग्णालयात गोंधळ घातला होता.