क्राईम, व्यापार

ढाकामध्ये गोदामाला भीषण आग;६९ जणांचा होरपळून मृत्यू

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट

ढाका (वृत्तसंस्था) बांगलादेशची राजधानी ढाकामधील एका रसायनाच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत ६९ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. गोदामाला लागलेली आग रहिवाशी इमारतींमध्ये पसरल्याने लोकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Akshay Trutiya

ढाका येथील ज्या परिसरात आग लागली तेथे इमारती आणि हॉटेल्स आहेत. इमारतीतून बाहेर पडता न आल्याने अनेकांना मृत्यू झाला आहे तर अनेक जण भाजले आहेत. केमिकल्स, बॉडी स्प्रे आणि प्लास्टिकची काही दुकानं या परिसरात असल्याने ही आग वाढली. भीषण आगीमधून आतापर्यंत ६९ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गॅस सिलेंडरमुळे ही आग लागली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून इमारतींमध्ये केमिकल्सचा साठा असल्याने आग पसरली असावी असाही अंदाज आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.