क्राईम, रावेर

झाडाची फांदी तोडल्याच्या वादातून दोघांना मारहाण ; चौघांविरुद्ध गुन्हा

शेअर करा !
MARAMARI
 

फैजपूर (प्रतिनिधी) बांधकामाला अडथळा ठरत असलेली झाडाची फांदी तोडल्याचा राग आल्याने चौघांनी दोघा तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना आज तालुक्यातील करंजी येथे घडली. याप्रकरणी फैजपूर पोलिसात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील करंजी येथे सुगंधाबाई सोपान पाटील यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाला जवळच असलेल्या निंबाच्या झाडाची फांदी अडथळा ठरत होती. ती फांदी सुगंधाबाईंचा मुलगा विजय पाटील व पुतण्या तेजराव पाटील यांनी तोडली. त्यामुळे जवळच असलेल्या सचिन सिताराम पाटील, सिताराम राजाराम पाटील, निर्मलाबाई सिताराम पाटील (रा.करंजी ता.यावल) व नवीन रामचंद्र पाटील (रा.वडगाव ता.रावेर) अशा चौघांनी विजय व तेजराव यांना लोखंडी आसारीने डोक्यावर मारहाण केली. या मारहाणीत दोघांना जबर दुखापत झाली. याप्रकरणी सचिन सिताराम पाटील, सिताराम राजाराम पाटील, निर्मलाबाई सिताराम पाटील व नवीन रामचंद्र पाटील या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस फौजदार सांगळे करीत आहे