जामनेर, व्यापार, सामाजिक

जामनेर तालुक्यात बांधकाम कामगार नोंदणी अभियान

शेअर करा !

jamner 3

जामनेर प्रतिनिधी । येथे पंचायत समिती कार्यालयात ना. गिरीश महाजन यांच्या सुचनेनुसार बांधकामाशी संबंधित 21 प्रकारच्या कामगारांची नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमला तालुका भरातील कामगारांचा प्रतिसाद मिळत असून कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

  • advt tsh flats
  • Sulax 1

याबाबत माहिती अशी की, या नोंदणी केलेल्या कामगारास व त्यांच्या पाल्यास याचा फायदा होणार असून दि. २५ ऑगस्ट रोजी मा.ना. गिरीश महाजन व कामगार मंत्री संजय कुटे यांच्या हस्ते सेफ्टी किटचे वितरण केले जाणार आहे. या कामगारांची नोंदणी २४ तारखेपर्यंत सुरू राहणार असल्याचे संबंधितांनी सांगितले. या नोंदणी अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी पितांबर भावसार, गटविकास अधिकारी अजय जोशी, विस्ताराधिकारी अशोक पालवे, राहुल देवरे, पवन लोखंडे तसेच पंचायत समिती कर्मचारी अधिकारी संबंधित कामगार विभागाचे कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले आहे.