राजकीय, राष्ट्रीय

महिनाभर काँग्रेसचे प्रवक्ते न्यूज चॅनेलवरील डिबेट शोमध्ये सहभागी होणार नाही

शेअर करा !


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्ष कारणमिमासा करत आहे. यामुळे त्यांनी एक निर्णय घेतला असून पुढील एक महिन्यापर्यंत काँग्रेसचा कोणीही प्रवक्ता वृत्तवाहिन्यांवरील चर्चांना उपस्थित राहणार नाही. कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

advt tsh 1

देशातील वृत्तवाहिन्या आणि संपादकांनी चर्चेच्या कार्यक्रमांममध्ये कोणत्याही काँग्रेसच्या प्रतिनिधीला पाचारण करू नये, अशी विनंतीही काँग्रेस पक्षाने केली आहे. आपले प्रवक्ते किंवा प्रतिनिधींना महिन्याभरासाठी वृत्तवाहिन्यांवर का पाठवायचे नाही? या बाबत मात्र काँग्रेसने खुलासा केलेला नाही. दरम्यान, या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. गेल्या शनिवारी झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत हा मुद्दा चर्चेत आला होता. काँग्रेसच्या प्रवक्त्यांना मीडिया चॅनेल्सवर होणाऱ्या डिबेटमध्ये जाणे बंद करावे. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या आधी समाजवादी पक्षाने अशा प्रवक्त्यांना हटविले होते.