क्राईम, राज्य

काँग्रेस आमदार विश्वजीत कदम अपघातातून बालंबाल बचावले

शेअर करा !

Vishwajit Kadam

पुणे प्रतिनिधी । काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि सांगलीतील आमदार विश्वजीत कदम यांच्या गाडीला पुण्यात मोठा अपघात झाला. या अपघातातून कदम थोडक्यात बचावल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

  • FB IMG 1572779226384
  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

याबाबत अधिक माहिती अशी की, विश्वजीत कदम यांच्या गाडीला काल रात्री पुण्यात मोठा अपघात झाला. सुदैवाने विश्वजीत कदम अपघातातून बालंबाल बचावले. अपघातात गाडीचं मोठं नुकसान झाले आहे. मात्र विश्वजीत कदम यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. अपघातानंतर विश्वजीत कदम कराडच्या दिशेने निघाले. विश्वजीत हे काँग्रेसचे दिवंगत नेते पंतगराव कदम यांचे पुत्र आहेत.