राजकीय, राज्य, राष्ट्रीय

काँग्रेसचे दहा बंडखोर आमदार आज घेणार अमित शहांची भेट

शेअर करा !

goa assembly 201808122215

पणजी वृत्तसंस्था ।  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळात बदल करुन बाबू कवळेकर यांना आज नवे उपमुख्यमंत्री पद देणार आहेत. गोवा प्रदेश भाजपाची कोअर टीम व काँग्रेसमधून भाजपात आलेले 10 आमदार आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटणार आहेत.

FB IMG 1572779226384

बुधवारी मध्यरात्रीच्या विमानाने सर्व दहा आमदार दिल्लीला गेले. दिल्लीतील गोवा निवासमध्ये 10ही आमदार व मुख्यमंत्री आणि भाजपा कोअर टीम यांची गुरुवारी सकाळी अनौपचारिक बैठक झाली. मंत्रिमंडळाची फेररचना केली जाणार आहे. शहा यांना सकाळी 10:30 वाजता भेटावे असे ठरले होते. केंद्रीय गृह मंत्री असलेले शहा हे संसदेच्या अधिवेशनात आणि कर्नाटकमधील राजकीय घडामोडींशी निगडीत विषयांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे सकाळी 11वाजेर्पयत गोव्यातील नेते शहा यांना किंवा जे.पी.नड्डा यांना भेटू शकले नाहीत. आज गुरुवारी दुपारनंतर हे सगळेजण गोव्यात परततील आणि मग सायंकाळीच 4 आमदारांची शपथविधी होईल. बाबू कवळेकर यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल. कारण कवळेकर हे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते असताना त्यांच्या नेतृत्वाखाली 10 आमदार फुटले. कवळेकर यांनी काँग्रेस पक्ष यापूर्वी कधीच सोडला नव्हता. 4 वेळा ते केपे मतदारसंघातून निवडून येऊन विधानसभेत पोहचले पण कधीच मंत्री झाले नाही. आता त्यांना उपमुख्यमंत्री बनण्याची संधी मिळेल. या शिवाय फिलीप नेरी रॉड्रीग्ज, मायकल लोबो आणि बाबूश मोन्सेरात यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. मोन्सेरात हे यापूर्वीही एकदा भाजपामध्ये होते आणि त्यांनी पर्रीकर मंत्रिमंडळात काम केले होते. लोबो हे कधीच मंत्री झाले नव्हते. फिलिप नेरी रॉड्रीग्ज यांनीही काही वर्षापूर्वी पर्रीकर मंत्रिमंडळात काम केले होते. गोव्यातील राजकीय घडामोडी हा सोशल मीडियावर मोठ्या चर्चेचा व टीकेचा विषय बनला आहे.