क्रीडा, यावल, शिक्षण

धनाजी नाना महाविद्यालयात स्पर्धा; विजेत्यांचा गौरव

शेअर करा !

danaji clg

फैजपूर प्रतिनिधी । येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय स्किल सेंटर आणि कन्हैया कम्प्युटर्स, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्री महोत्सवानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते नुकतेच गौरविण्यात आले आहे.

  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels
  • FB IMG 1572779226384

या स्पर्धातील बक्षीस वितरण समारंभासाठी प्रसिद्ध लेखक प्रा.वसंत पुरुषोत्तम होले यांना आमंत्रित करण्यात आले होते. यासोबत कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर चौधरी हे होते. यावेळी प्रा. वसंत पु. होले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी मोबाईलचा वापर विधायक करावा, ज्याप्रमाणे मोबाईल वापराचे फायदे आहेत. त्याचप्रमाणे अनेक तोटेही आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन जीवन जगताना ध्येयाकडे वाटचाल करावी आणि प्रचंड मेहनतीने इप्सित साध्य करावे. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.चौधरी यांनी महाविद्यालय आणि स्कील सेंटरच्या वतीने उपलब्ध सोयी सुविधांचा विद्यार्थ्यांनी विधायक वापर करावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्किल सेंटरच्या संचालिका दिपाली महाजन व महाजन यांनी परिश्रम घेतले.