चोपडा, सामाजिक

चोपडा येथे रा.स्व. संघातर्फे विजयादशमी उत्सवाचे आयोजन

शेअर करा !

happy

चोपडा प्रतिनिधी । येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमी उत्सवाचे उद्या (दि.८) सकाळी साडेसात वाजता आयोजन केले असून बापू डेअरीचे संचालक बापू महाजन यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

या उत्सवाला प्रमुख वक्ते भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री चंदन पाटील हे बौध्दीकातून मार्गदर्शन करणार आहेत. उत्सव माळी समाज मंगल कार्यालय खाईवाडा (पाटील गढी) येथे होणार आहे. यावेळी शस्त्रपुजनही करण्यात येणार आहे. तसेच उत्सवानंतर शहरातील विविध भागातून पथसंचलन काढण्यात येणार असून त्याचा समारोप नवग्रह मंदिर, शेतपूरा येथे करण्यात येणार आहे. यावेळी स्वयंसेवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन तालुका संघचालक डॅा.मनोज विसावे यांनी केले आहे.