जामनेर, ट्रेंडींग

चिंचोली पिंप्रीत वाय-फायसह आधुनीक सुविधा

शेअर करा !

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचोली पिंप्री या गावामध्ये वाय-फायसह सर्व आधुनीक सुविधा देण्यात आल्या असून हे गाव खर्‍या अर्थाने स्मार्ट व्हिलेज बनल्याने याच्या पदाधिकार्‍यांचे कौतुक करण्यात येत आहे.

  • advt tsh flats
  • Sulax 1

चिंचोली पिंप्री या गावात खान्देशातून पहिल्यांदाच पूर्णपणे मोफत वाय-फाय सेवा देण्यात आली आहे. याच्या जोडीला गावात एलईडी बल्बचा वापर, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी भूमिगत गटारींसह शोषखड्डे वनराई बंधारे, विविध दाखल्यांसाठी ऑनलाईन सेवा-सुविधा, यासह शाळा डिजिटल, सीसीटीव्ही कॅमेर्‍याने संपूर्ण गावावर लक्ष, पंचायतीची पाणपट्टी आणि घरपट्टीची वसुलीही शंभर टक्के सर्व गावात स्वच्छतागृह आणि शंभर टक्के शौचालयांचा वापर अशा अनेक बाबींमुळे चिंचोली पिंप्री ग्रामपंचायत ही आदर्श ठरली आहे.