मुक्ताईनगर, राजकीय

सावदा येथून अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ

शेअर करा !

chandrant patil sawada

सावदा प्रतिनिधी । मुक्ताईनगर विधानसभेसाठी महाआघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी सावदा येथील दुर्गा माता मंदिराचे दर्शन घेवून प्रचाराचा नारळ फोडुन शुभारंभ केला. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांची गर्दी जमली होती.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

संपुर्ण राज्याचे लक्ष लागुन असलेल्या मुक्ताईनगर मतदार संघात बहुचर्चित महाआघाडी पुरस्कृत अपक्ष ऊमेदवार चंद्रकांत पाटील यांनी प्रचंडच्या संख्येत निवडणुक चिन्ह असलेल्या ट्रँक्टरवर बसुन सावदा येथील ग्रामदैवत दुर्गा माता मंदिराचे दर्शन घेतले. मुक्ताईनगर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाई व मित्रपक्ष आघाडी पुरस्कृत माननिय चंद्रकांत पाटिल यांनी सावदा शहरातुन प्रचाराचा झंझावात सुरु केला. सावदा शहराचे ग्रामदैवत दुर्गा माता मंदिरात दर्शन घेउन प्रचाराचा नारळ फोडत शुभारंभ केला. गांधी चौक येथील मोठा मारोती येथे दर्शन घेतले. तसेच हजरत पीर शाह व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करत प्रचाराचा झंझावात सुरु केला.