क्राईम, चाळीसगाव, शिक्षण

विद्यार्थ्यांनी प्रयोगात्मक शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे – प्राचार्य डॉ. बिल्दीकर

शेअर करा !

chalisgaon news 3

चाळीसगाव प्रतिनिधी । विद्यार्थ्यांनी प्रयोगात्मक शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे व जिज्ञासूवृत्ती जोपासली पाहिजे तसेच आपण आपल्या परिसरातले छोटे छोटे प्रश्न घेऊन त्याचे संशोधन केले पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर यांनी केले.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

येथील आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालयात आज विज्ञान मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विज्ञान मंडळाचे उद्घाटन प्रा.डॉ.डी.एस. भारंबे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर होते. यावेळी मराठी विज्ञाप परिषदेचे कोषाध्यक्ष प्रा. नेहते, उपप्राचार्य डॉ पी.एस. बाविस्कर, उपप्राचार्य एस.ए.मुठाणे, उपप्राचार्य प्रा. अजय काटे, विज्ञान मंडळाचे प्रमुख प्रा.डी.एन.उंदीरवाडे व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी विज्ञान मंडळाचे प्रमुख प्रा.डी.एन. उंदीरवाडे यांनी विज्ञान मंडळामार्फत वर्षभरात घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच आपल्या उदघाटनपर भाषणात डॉ. भारंबे म्हणाले कि विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी त्यांच्या दैनंदिनी येणाऱ्या प्रत्येक गोष्टींचे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन आकलन करावे तसेच त्यांनी विज्ञानावर आधारित विविध प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दीक्षा मोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रियांका देशमुख यांनी मानले.