क्राईम, चाळीसगाव

चाळीसगाव येथील अट्टल गुन्हेगार पोलीसांच्या जाळ्यात

शेअर करा !

aaropi

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील पंडीत मोतीराम सराफ दुकानातून ९० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना घडली होती.

  • Online Add I RGB
  • advt tsh 1
  • advt atharva hospital

याबाबत माहिती अशी की, येथील शहर पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बीचे पोलीस नाईक राहुल पाटील, पोकॉ गोवर्धन बोरसे, गोपाल बेलदार, प्रविण सपकाळे या कर्मचा-यांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवत दागिने चोरणारा अट्टल गुन्हेगारास हैदर सादीक सैय्यद (वय-२९) रा. भिवंडी गायबी नगर, ह.मू.मालेगाव या आरोपीस 9 जुलै रोजी सिने स्टाईल पद्धतीने ताब्यात घेतले आहे. या गुन्हेगाराचे राज्यासह परराज्यातील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड यांनी वर्तवली आहे. आरोपी सापडल्यामुळे सराफ व्यावसायिक शामकांत भामरे यांनी पोलीस निरीक्षक व कर्मचा-यांचा सत्कार केला आहे.