चाळीसगाव, राजकीय

चाळीसगाव येथे काँग्रेसच्यावतीने तहसीलदारांना निवेदन

शेअर करा !

nivedan 40

 

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने आज (दि.10 जुलै) रोजी सकाळी 10 वाजता येथील तहसीलदार अमोल मोरे यांना महाराष्ट्र शासनाच्या कारभाराबाबत व केंद्र शासनाने अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेल यावर लावलेला अस्मानी कर याबाबत निवेदन देऊन निषेध करण्यात आला.

  • PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels
  • FB IMG 1572779226384

या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, मालाड मुंबई येथे भ्रष्टाचारामुळे पडलेल्या भिंतीत नाहक २७ जणांना आपला जीव गमवावा लागला, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्याने 21 जणांचा मृत्यू होऊन, 4 जण अजूनही बेपत्ता आहेत. या घटनेचा राज्य सरकारच्या मंत्र्यांनी बेताल वक्तव्य केल्याचा निषेध नोंदवण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या पीककर्ज वाटपाबाबत बँकाकडून सुरू असलेली अडवणूक व राज्य सरकारची उदासीनता याचाही निषेध करण्यात आला आहे.
या निषेध पत्रकावर शहर काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र पाटील, रमेश शिंपी, ॲड. वाडीलाल चव्हाण, अल्ताफ खान समशेर खान, काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष आर.डी.चौधरी, रामदेव चव्हाण, मा.आ. ईश्वर जाधव, अशोक खलाने, सुधाकर कुमावत, लुकमानबेग नबीबेग, शेख समीर शब्बीर शेख, मंगेश अग्रवाल, शोभाताई पवार, जगन पवार, मधुकर गवळी, सुनील राजपूत, अनिल राऊत, भुषण पाटील, रवींद्र जाधव, नितीन सूर्यवंशी, पंकज शिरोडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.