राजकीय

महापालिकेसमोर ना. महाजन समर्थकांचा जल्लोष

शेअर करा !

yuti celebrations

जळगाव प्रतिनिधी । ऐन निवडणुकीच्या तोंडावर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद ना. गिरीश महाजन यांना मिळाल्याचे वृत्त येताच त्यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला आहे.

  • Sulax 1
  • advt tsh flats
  • spot sanction insta

याबाबत वृत्त असे की, आज जळगावच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे ना. गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तर जळगावचे विद्यमान पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आज दुपारी पालकमंत्रीपदाचे वृत्त येताच ना. महाजन यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. महापालिकेसमोर युतीच्या समर्थकांनी जोरदार आतषबाजी केली. उपमहापौर डॉ. अश्‍विन सोनवणे, ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे, माजी महापौर ललीत कोल्हे, माजी उपमहापौर सुनील महाजन, नगरसेवक प्रशांत नाईक आदींची याप्रसंगी उपस्थिती होती. याप्रसंगी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला.