जळगाव, मनोरंजन, शिक्षण

सार्वजनिक विद्यालयात ‘कलाविष्कार’ जल्लोषात साजरा

शेअर करा !
वाचन वेळ : 1 मिनिट
असोदा ता.जळगाव (वार्ताहर)  असोदा येथे सार्वजनिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे ‘कलाविष्कार’ स्नेहसंमेलन जल्लोषात साजरे करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलासदादा चौधरी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सचिव कमलाकरदादा सावदेकर, चेअरमन उध्दवदादा पाटील, तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ उपस्थित होते. कलाविष्कार कार्यक्रमात लोककला, स्त्री-भ्रूणहत्या, नशामुक्ती,शेतकरी आत्महत्या, पर्यावरण या विषयावर संदेश देणारे कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. या कार्यक्रमाला गावातील प्रेक्षकांनी उस्फूर्तपणे दाद दिली. कार्यक्रमाचे परीक्षण  प्रणिता झोपे व सुनीता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन चारुलता टोके,शुभांगीनी महाजन,मंगला नारखेडे,गोपाळ महाजन यांनी केले तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या खाचणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक डॉ. मिलिंद बागुल व सर्व शिक्षकबंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Leave a Comment

Your email address will not be published.