पारोळा, सामाजिक

पारोळ्यात मोठ्या भक्तिभावाने रथोत्सवास साजरा

शेअर करा !

WhatsApp Image 2019 10 09 at 5.54.24 PM

पारोळा, प्रतिनिधी | येथे श्री बालाजी रथोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. विविध व्यायाम शाळांनी या  रथोत्सववात भाग घेतला होता. यात शिवाजी व्यायाम शाळा, जय गुरुदेव व्यायाम शाळा, बालोदय व्यायाम शाळा,जय भवानी मित्र मंडळ,सिंहगर्जना मित्र मंडळ, तरुण मित्र मंडळ, जिजाऊ ढोल पथक, महाराणा प्रताप विद्यालय बोळे यांचा सहभाग होता. शिवाजी व्यायाम शाळेचा देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

PPRL 01 19 Social Media Post 1080 x 1080 Pixels

रथाची महापूजा दुपारी वंशजाच्या हस्ते करण्यात आले. यजमान म्हणून आमदार सतीश पाटील,उप नगराध्यक्ष मंगेश तांबे. यांनी रथाचे पूजन केले. रथास ४ मोठे लांब असे १०० ते २०० फूट दोर लावण्यात आले आहे. वाद्यवाले, लेझिमवाले, तुतारीवाले, भेरवाले, गुरव, तालिमवाले, यांनी आपल्या गाड्या सजवून रथाच्यापुढे लावले आहे. यात ते लाठी, काठी, भाले, तरवारी पट्टे यांचे खेळ करत आहेत. देवीचे सोंगवाले  वगैरे बरेच लोक वाद्ये घेऊन श्रींच्या रथापुढे वाजवित आहेत. गावातील स्त्री-पुरुष श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. अनेक हमालांकडून मोगरीचे ने-आण होऊन रथ थांबविण्यास मोगरीचा उपयोग करण्यात येत आहे. रथास साधारण ४०-४५ मोगरया लागतात. मोगऱ्या बुधा बारी, वसंत बारी, प्रकाश चौधरी, मोतीलाल बारी.इ. कौशल्याने करतात. हा रथ ओढ्ण्यास साधारण २०० ते ३०० माणसे लागतात. १०ते १२ चोपदार रथाजवळ रथ ओढणाऱ्यास दिशा दाखवितात.