राजकीय

WhatsApp Image 2019 10 23 at 5.01.45 PM
जळगाव राजकीय

मतमोजणीची तयारी पूर्ण – दीपमाला चौरे (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली असून, जळगाव शहर मतदारसंघांची मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळच्या गोदामात होणार आहे. येथे सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांसह सीआयएफएसचे जवान तैनात आहेत. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी दीपमाला चौरे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील मतमोजणी उद्या गुरुवार २४ ऑक्टोबर रोजी संबंधित […]

EVM Congress NCP
क्राईम राजकीय राज्य

इव्हीएम प्रकरण : नवलेवाडी येथील राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रतिनिधीवर गुन्हा दाखल

  सातारा प्रतिनिधी । कोणतेही बटण दाबल्यास मत कमळाला अर्थात भाजपाच्या उमेदवाराला जात असल्याची खोटी माहिती प्रसारमाध्यमांना देऊन निवडणूक प्रक्रियेविषयी समाजात गैरसमज पसरवल्या प्रकरणी नवलेवाडी (ता. खटाव) येथील दीपक रघुनाथ पवार यांच्यावर पुसेगाव पोलिस ठाण्यात अखदलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्राध्यक्ष गुलाब गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर हा गुन्हा दाखल […]

Voting
राजकीय राज्य रावेर

रावेर येथे मतमोजणीची जय्यत तयारी

रावेर प्रतिनिधी । रावेर विधानसभा निवडणुक मतदार संघातील मतमोजणीची जय्यत तयारी झाली असून तहसील कार्यालय सज्ज असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अजित थोरबोले यांनी नुकतेच सांगितले. रावेर तहसीलच्या प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीत वॉटरप्रूफ मंडप टाकून मतमोजणीची तयार करण्यात आली आहे. उद्या दि.२४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. १४ […]

sanjay raut
राजकीय राज्य

भाजपाला जास्त जागा पण शिवसेनेशिवाय पर्याय नाही – खा. राऊत

मुंबई, वृत्तसंस्था | राज्यात भाजपाला शिवसेनेशिवाय पर्याय नसून, शिवसेनेशिवाय ते राज्य करु शकत नाहीत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यावेळी त्यांनी शिवसेना विधानसभा निवडणुकीच्या निकालात १०० चा आकडा पार करेल, असा आत्मविश्वासही व्यक्त केला. तसेच महायुती २०० चा आकडा पार करेल, असा दावाही त्यांनी केला. महायुती […]

jayant patil
राजकीय राज्य

राष्ट्रवादी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल : जयंत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी पक्ष पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. श्री. पाटील यांनी राज्यात पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना युतीचे सरकार येण्याचे अंदाज दाखविणारे एक्झिट पोलचे दावे फेटाळून लावले आहेत.   एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना युतीचे सरकार […]

sanjay kadam1
क्राईम राजकीय राज्य

निकालापूर्वीचं विजयी मिरवणूक काढणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवारावर गुन्हा दाखल

रत्नागिरी वृत्तसंस्था । विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सोमवारी मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. आता सर्वांना २४ तारखेला होणाऱ्या मतमोजणीची ओढ लागलेली असून रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय कदम यांनी निकालापूर्वीच विजयी मिरवणूक काढल्याने त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभेचे मतदान पार पडल्यानंतर संजय कदम यांचे काही […]

jc8kolng evm and vvpat 625x300 20 March 19
राजकीय राज्य

अगा जे ‘साताऱ्यात’ घडलेची नाही…वृत्तात कसे आले..?

सातारा, वृत्तसंस्था | लोकसभा पोटनिवडणूक आणि कोरेगांव विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान सोमवारी (दि.२१) मतदान केंद्र क्रमांक २५० नवलेवाडी येथे ईव्हीएममध्ये बिघाड होऊन कोणत्याही उमेदवारासमोरील बटण दाबल्यास मत कमळाला अर्थात भाजपाच्या उमेदवाराला जात असल्याचे वृत्त स्थानिक ग्रामस्थांच्या हवाल्याने माध्यमांमधून प्रसिद्ध झाले होते. मात्र, साताऱ्यातील संबंधीत मतदान केंद्रावर असे काहीही घडलेले नाही, असे […]

jc8kolng evm and vvpat 625x300 20 March 19
जळगाव राजकीय सामाजिक

जळगाव जिल्ह्यात मतमोजणीची तयारी अंतिम टप्यात

जळगाव, प्रतिनिधी | सोमवार २१ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या विधानसभा मतदानानंतर जिल्ह्यात मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात सुरु आहे.  जिल्ह्यातील ११ विधानसभा क्षेत्रात सरासरी ६०.९० टक्के इतके मतदान झाले असून मतमोजणी गुरुवार २४ ऑक्टोबर रोजी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली असून याकरीता […]

suresh jain
जळगाव राजकीय सामाजिक

सुरेशदादा जैन यांची प्रकृती बिघडल्याने जे.जे.रुग्णालयात हलवले

जळगाव, प्रतिनिधी | घरकुल घोटाळ्यातील आरोपी असलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची तब्येत आज (दि.२२) अचानक बिघडल्याने त्यांना मुंबई येथील जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ हलवण्याच्या हालचाली सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. सुरेशदादा  जैन यांना घरकुल घोटाळ्यात शिक्षा झाल्याने त्यांना नाशिक कारागृहात ठेवण्यात आले आहे. आज कारागृहात असताना त्याची प्रकुती दुपारी अचानक […]

sawarkar and singhavi
राजकीय राष्ट्रीय

काँग्रेस नेते मनुसिंघवी म्हणतात, “सावरकरांचा संघर्ष मोठा होता”

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार अभिषेक मनू संघवी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत “सावरकरांनी स्वातंत्र्य आणि दलितांच्या अधिकारांसाठी मोठा संघर्ष केला आणि देशासाठी ते तुरूंगातही गेले”, असे ट्विट त्यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटवरून काँग्रेसचे अनेक नेते हैराण झाले आहेत.   संघवी यांचे ट्विट व्हायरल झाल्यानंतर त्यांना […]