रावेर

raver 1
रावेर सामाजिक

रावेर येथे रामस्वामी महाराजांची पुण्यतिथी साजरी

  रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील प्रसिद्ध रामस्वामी महाराजांची पुण्यतिथी नुकतीच साजरी करण्यात आली. सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, रामस्वामी मठात जयंत कुलकर्णी, प्रतिभा कुलकर्णी यांचे हस्ते सपत्नीक महाराजांच्या समाधीवर अभिषेक, पूजन, आरती करण्यात आली असून पुजारी प्रकाश जोशी, संजय मटकरी यांनी मंत्रोच्चार केले. यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी ब्रह्मवृंद […]

ganesh murti
रावेर सामाजिक

रावेरात द्रवरूप तुरटीपासून बनवलेल्या मूर्तींमुळे गणेशोत्सव होणार पर्यावरणपूरक

रावेर, प्रतिनिधी | द्रवरूप तुरटीपासून पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्ती घडवण्याचा प्रयोग भुसावळ येथील उद्योजक रामकृष्ण ढाके यांनी यशस्वी केला आहे. तुरटीपासून साकारलेल्या गणेशमूर्तीच्या विसर्जनानंतर पाण्याचे प्रदूषण तर होणार नाहीच, पण प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींमुळे होणारे प्रदूषणही रोखण्यास त्यामुळे मदत होणार आहे.   रावेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्या संकल्पनेला ढाके यांनी […]

download 1 1
भुसावळ यावल राजकीय राज्य रावेर

रावेर पुरवठा अधिका-यावर कारवाईची मागणी ; आंदोलनाचा इशारा

भुसावळ प्रतिनिधी । धान्याच्या काळ्या बाजाराकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या रावेर तालुका पुरवठा अधिकारी हर्षल पाटील यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन उपविभागीय अधिका-यांना आज दि. १९ ऑगस्ट रोजी देण्यात आले, असून रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांचे वतीने लोकशाही मार्गाने जनहितार्थ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ही यावेळी देण्यात आला आहे. याबाबत माहिती […]

na. haribhau javale
यावल राजकीय रावेर

ना. जावळे यांच्या पाठपुराव्यामुळे यावल-रावेर मतदारसंघात एक कोटीची कामे मंजूर

रावेर, प्रतिनिधी | ना. हरिभाऊ जावळे यांच्या प्रयत्नातून रावेर विधानसभा मतदार संघातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत एक कोटी इतका निधी मंजूर झाला आहे.   मंजूर कामे पुढील प्रमाणे :- पाडळसे वार्ड क्र ५ मध्ये […]

44e280d8 8f62 402e b8a2 6cc3dc817af1
क्राईम रावेर

रावेर रेशन रॅकेट ; आरोपींच्या शोधार्थ पथकं रवाना (व्हीडीओ)

रावेर (प्रतिनिधी) गरीब जनतेचा रेशनचा माल अवैधरीत्या साठवून ठेवल्या प्रकरणी दि 15 ऑगस्ट रोजी रावेर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. संबधित आरोपीच्या शोधात पोलिसांनी चांगलीच कंबर कसली असून जो पर्यंत आरोपी मिळत नाही. तोपर्यंत यात कोण-कोणाचा सहभाग आहे, हे कळणार नाही. त्यामुळे संशयितांना पकडण्यासाठी वेग-वेगळ्या दिशेने पथके पाठवील्याची माहिती तपास […]

raver news reshan satha japt
क्राईम रावेर

रावेरात २८ लाखांचा अवैध रेशनसाठा जप्त; दोघांवर गुन्हा

रावेर प्रतिनिधी । गरीब जनतेसाठी शासनामार्फत पाठविलेला रेशनचा धान्यसाठा अवैध पध्दतीने काळा बाजार करण्यासाठी साठवून ठेवलेला गोडाऊनवर जिल्हा पुरवठा विभागाच्या टीमने छापा टाकला. या छाप्या मधुन सुमारे 28 लाख 10 हजार 300 रुपये किमतेचा गहू मका साखर तांदूळ जप्त करण्यात आला आहे. अवैध रेशनच्या धान्यसाठयावर जिल्हा भरातील सर्वात मोठी कारवाई […]

raver tiranga rayli
यावल रावेर

रावेर येथे अ.भा.वि.प.च्या वतीने तिरंगा पदयात्रा

रावेर प्रतिनिधी । अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेल्या ७२ पासून विद्यार्थ्याच्या हितासाठी काम करणारी संघटना आहे. आज स्वतंत्र दिनानिमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, रावेर शाखेतर्फे शहरात 73 मीटर तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत विविध महाविद्यालय, शाळा, खाजगी क्लासेस व रावेर मधील विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. रॅलीची सुरवात ही […]

van jamin
यावल रावेर

वन विभागाने काढले जमिनीवरील अवैध अतिक्रमण

रावेर प्रतिनिधी । जामन्या वनक्षेत्रात अनअधिकृत पणे वनविभागाच्या सुमारे सात हेक्टर जमीनीवर अवैध पध्दतीने केलेल्या अतिक्रमणावर वनपाल अक्षय म्हेत्रे यांच्या टीमने धडक कारवाई करत अतिक्रमण काढले आहे या बाबत वृत्त असे की, यावल अभरण्यातील जामन्या वनक्षेत्रातील कक्ष क्र २० मध्ये सुमारे ७ हेक्टर जमिनिवर अनअधिकृतपणे अतिक्रमण केले होते. या अनुषंगाने […]

featured image
रावेर

रावेरात अवैध रेशन धान्यसाठ्यांवर पुरवठा विभागाची कारवाई

रावेर प्रतिनिधी | स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला रावेर शहरात ठिकठिकाणी रेशन साठयात गहू, मका अवैध पध्दतने खाजगी गोडाऊंमध्ये ठेवल्याने रात्री उशिरापर्यंत जिल्हापुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी व तहसीलदार उषारानी देवगुणे यांच्या टीमची छापे-मारी सुरु केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विश्वनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रावेर शहरात गरीब जनतेचा रेशन धान्यसाठाचा गहू, मका […]

usha rani devagune
राजकीय रावेर

रावेर-तामसवाडीचा रस्ता तत्काळ सुरु करा : राष्ट्रवादीचे निवेदन

रावेर प्रतिनिधी । रावेर-तामसवाडीचा जूना रस्ता हा पुर्वीप्रमाणे तत्काळ सुरु करण्यात यावा, यासाठी आज दि. 14 ऑगस्ट रोजी येथील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शे मेहमुद मन्यार यांच्यातर्फे तसिलदार उषाराणी देवगुणे यांना निवेदन देण्यात आले असून आंदोलन छेडण्याचा इशारा ही यावेळी देण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील रावेर-तामसवाडी रस्ता […]