एरंडोल

featured image
एरंडोल क्राईम

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली

एरंडोल प्रतिनिधी । येथील बसस्टँड वरून एक महिला बस मध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्याने तिच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याची पोत लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत एरंडोल पोलीस सुत्रांनुसार मिळालेली माहिती अशी की १६ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता निशा राजेंद्र कोळी (राहणार मंगरूळ ता.चोपडा) या एरंडोल बसस्थानकावर बस मध्ये […]

featured image
एरंडोल क्राईम

शेतीच्या व्यवहारात एकाची फसवणुक

एरंडोल प्रतिनिधी । म्हसावद येथील व्यक्तीने जळगाव येथील एकास शेतीच्या व्यवहारात फसविले असल्याची तक्रार एरंडोल पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. याबाबत पोलीस स्टेशन वरून मिळालेली माहिती अशी की दगडू गुलाब पठाण (राहणार म्हसावद) यांच्याकडून कुंदन दगडू देसले (राहणार मायदेवी नगर, जळगाव) यांनी दि.८/१/२०१६ रोजी शेत गट नं ४२१ ची रजि.प्रांत […]

velle
एरंडोल शिक्षण

लिटिल व्हॅली स्कुलमध्ये स्वातंत्र्यदिनसह रक्षाबंधन उत्साहात

एरंडोल प्रतिनिधी । कासोदा येथील भडगाव रोड विश्राम नगर जवळील लिटिल व्हॅली प्री. प्रायमरी स्कुलमध्ये दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सविस्तर माहिती अशी की, शाळेचे संचालक अशोक पाटील यांनी ध्वजारोहनासाठी परिसरातील भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले सैनिक, सेवानिवृत्त सैनिक, पी.एस.आय. यांना ध्वजारोहनांसाठी आमंत्रित […]

kasoda 1
एरंडोल सामाजिक

नुरुद्दीन मुल्ला यांना ‘बेस्ट सोशल वर्कर’ पुरस्कार

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील कासोदा येथील मौलाना आजाद विचार मंचचे जिल्हा संघटक तथा भारतीय पत्रकार महासंघाचे तालुकाध्यक्ष नुरुद्दीन मुल्ला यांना 15 ऑगस्ट रोजी मुक्ताईनगरातील रहनुमा एज्युकेशनल वेल्फेअर सोसायटीतर्फे ‘बेस्ट सोशल वर्कर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासंदर्भात माहिती अशी की, रहनुमा एज्युकेशनल वेल्फेअर सोसायटीच्या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. याचबरोबर प्राध्यापक […]

erandol news
एरंडोल सामाजिक

एरंडोलकर सरसावले पुरग्रस्तांच्या मदतीसाठी (व्हिडीओ)

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल येथे मैत्री संघ फाऊंडेशनच्या माध्यमातून युवकांनी कोल्हापूर, सांगली, सातारा येथील महापुरातील पीडितांसाठी पूरग्रस्त सहाय्यता अभियानांतर्गत रा.ती.काबरे विद्यालयासमोर 12 ते 15 ऑगस्ट 2019 दरम्यान शिबिराचे आयोजन केले आहे. सागर महाजन, पंकज पाटील, पियुष चौधरी, शुभम महाजन, साहिल पिंजारी, निखिल वाणी, आदित्य पाटील, करण पाटील, मनोज महाजन, विनीत […]

WhatsApp Image 2019 08 11 at 6.45.29 PM
एरंडोल राजकीय सामाजिक

जमादा डाव्या कालव्यातून अंजनी धरणात पाणी सोडण्याची मागणी

एरंडोल, प्रतिनिधी | तापी खोरे महामंडळाचे नूतन उपाध्क्ष माजी आमदार चिमणराव पाटील यांनी माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी तालुक्यातील अंजनी प्रकल्पात जमादा कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी त्यांनी केली आहे. अर्धा  पावसाळा उलटूनही एरंडोल तालुक्याला संजिवनी देणाऱ्या अंजनी प्रकल्पात सध्यस्थितीत शुन्य टक्के जलसाठा असल्याने पावसाळी हंगामात जमादा […]

featured image
एरंडोल

एरंडोलच्या तत्कालीन न.पा. अभियंत्यास माहीती दडविल्याने ७ हजार रुपये दंड

  एरंडोल, प्रतिनिधी । येथील नगर पालिकेत कार्यरत तत्कालीन बांधकाम अभियंता पंकज पन्हाळे यांना राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक यांच्यातर्फे एरंडोल शहरातील दोन नागरिकांनी मागितलेली माहिती न दिल्याने दोन प्रकरणात सात हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. याबाबत माहिती अशी की, एरंडोल शहरातील रहिवाशी रविंद्र नंदलाल लढे यांनी चावडी समोरील मुतारीची […]

baithak 1
एरंडोल सामाजिक

एरंडोल व धरणगाव तालुक्याची नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन बैठक

एरंडोल प्रतिनिधी । येथील व धरणगाव तालुक्याची नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन तातडीची आढावा बैठक दि. 9 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता तहसील कार्यालयात प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याबाबत अधिक माहिती अशी की, यावेळी प्रांताधिकारी यांनी ग्रामीण भागात विद्युत पुरवठयाबाबत काळजी घेणे, रस्त्यावर झाडे पडल्यास तात्काळ अडथळा दूर करणे, […]

7a6386f3 0bb4 48c3 a59b 3d681941a97f
एरंडोल धरणगाव सामाजिक

नांदेड येथे अधिकाऱ्यांकडून पूर पाहणी

धरणगाव , प्रतिनिधी | तालुक्यातील नांदेड येथे एरंडोलचे प्रांतधिकारी विनय गोसावी आणि धरणगाव बीडीओ स्नेहा कुडचे यांनी गिरणा नदीची पूरपाहाणी केली. ग्रामपंचायत बैठकीनंतर गुलाबवाडीतील नागरिकांच्या विनंतीवरून बीडीओ कुडचे यांनी गुलाबवाडीची पाहणी केली असता, तेथील अत्यंत वाईट परिस्थिती दिसली.   येथील ६० घरांना अजूनही रस्ता नाही. गटारीतून चालत जावे लागते. पाणीपुरवठ्याचे […]

erandol pratinidhi
एरंडोल शिक्षण

भारतीय सैनिकांना राख्या पाठवून विद्यार्थीनींचा अनोखा उपक्रम

एरंडोल प्रतिनिधी । येथील ग्रामीण उन्नती मंडळ संचलित माध्यमिक विद्यमंदिर शाळेच्या आर.एस.पी.च्या विद्यार्थिनींनी ज्या सैनिक बांधवामुळे आपण सुरक्षित आहोत. जे देशासाठी सिमेवर डोळ्यात तेल घालुन पहारा देतात अशा सैनिकांना राख्या व पत्र पाठवले. आर.एस.पी. शिक्षिका सविता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींनी राख्या बनविल्या आहेत. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुषा चव्हाण, शिक्षक, शिक्षिका […]