क्राईम, भुसावळ

कार-दुचाकीच्या अपघातात दोन तरूण जागीच ठार

शेअर करा !

apghat 2

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील कुऱ्हे (पानाचे) येथून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर बोदवड रस्त्यावर दुचाकीला भरधाव बोलेरो कारने धडक दिल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी 2 वाजेच्या सुमारास जोगेश्वरी माता मंदिराजवळ घडली. याप्रकरणी पोलीसांनी बोलेरो चालकास अटक केली आहे.

  • Sulax 1
  • advt tsh flats
  • spot sanction insta

 

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील रहिवासी पराग लक्ष्मण पाटील (वय-23) व वैभव गजानन सरोदे (वय-25) हे दोघे तरुण जामनेर तालुक्यातील फर्दापूर येथे 12 वी पास झाल्यानंतर बीएससी मध्ये प्रवेश घेण्यासाठी गेले होते. ते प्रवेश प्रक्रिया घेऊन परतत असतांना कुऱ्हे (पानाचे) मार्गे घरी वापस जात असताना त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच19 ए.सी. 5557) ला बोदवडकडून कुऱ्हे (पानाचे) येथे जात असलेली बोलोरो क्रमांक (एम.एच.12 के.जे. 598)ने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुण जगीच ठार झाले. हा अपघात होताच दोनही तरूण 10 फुट वर हवेत फेकले गेले होते. तर दुचीचा ही चक्काचूर झाला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती कुऱ्हे (पानाचे) येथे समजताच ग्रामपंचायत सदस्य नारायण कोळी यांच्यासह शेकडो नागरिक मदतीसाठी धावले. मात्र तोपर्यंत दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला असल्याचे दिसून आले. त्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसांना लागलीच माहिती दिली. त्यामुळे पोनि रामकृष्ण कुंभार, पोउनि गजानन करेवाड व सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत दोन्ही तरुणांचे नातेवाईक हेही घटनास्थळी पोहोचले होते. त्यामुळे पोलिसांनी पंचनामा करून या तरुणांचे मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी वरणगाव येथे रवाना केला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पं.स.माजी सदस्य अरुण इंगळे, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष डॉ.दीपक पाटील, किरण चोपडे आदींनी ही घटनास्थळी भेट दिली.