क्राईम, चाळीसगाव

कार-दुचाकीच्या अपघातात महिला जागीच ठार; एक जण गंभीर

शेअर करा !
वाचन वेळ : 2 मिनिट
chalisgaon acident
chalisgaon acident

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील खरजई नाक्याजवळ मोटरसायकल व इंडिकाचा समोरासमोर अपघात होऊन या अपघातात महिला जागीच ठार झाली तर मोटर सायकल चालक जखमी झाला आहे. अपघातातील इंडिका ही चोरीची असल्याचा संशय असून या इंडिकामध्ये चोरून नेल्या जाणाऱ्या शेळ्या आढळल्या आहेत.

  • new ad
  • advt tsh 1
  • advt atharva hospital
  • vignaharta
  • Online Add I RGB

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, अंजनाबाई उर्फ बेबाबाई पंढरीनाथ चौधरी (वय- 55) रा. खरजंई नाक्याजवळ ह्या आपला मुलगा सुनील चौधरी यांच्यासोबत उपचारासाठी दुचाकीने दवाखान्यात जात असताना 12 वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहराकडून भडगावकडे जाणाऱ्या भरधाव इंडिका गाडीने त्यांचे मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने अंजनाबाई जागीच ठार झाल्या असून मुलगा सुनील चौधरी हा जखमी झाला. जखमीस शहरातील देवरे रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सदर अपघातात पोलिसांना सापडलेली इंडिका ही बनावट नंबरची असण्याची दाट शक्यता असून या गाडीमध्ये विविध नंबरच्या सहा ते सात नंबर प्लेट आढळून आल्या आहे. याच गाडीत चोरून नेल्या जात असलेल्या 3 शेळ्या मिळून आल्या आहेत. गाडीमध्ये एकूण तीन प्रवाशांपैकी दोन पळून जाण्यात यशस्वी झाले असून चालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. अंजनाबाई चौधरी यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत असतानाच या अपघातातून शहरातील अनेक गुरे शेळ्या चोरीचे गुन्हे या इंडिका गाडीतील चालकाच्या सापडल्यामुळे उघडकीस येण्याची शक्यता आहे याबाबत चाळीसगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.