क्राईम, चोपडा

चालकाला भोवळ आल्याने कारला अपघात; तिघे गंभीर

शेअर करा !

apghat 1

धानोरा प्रतिनिधी । बऱ्हाणपूर -अंकलेश्वर या राज्यमहामार्गावरील धानोरा-पंचक दरम्यान गवळी नाल्याच्या पुलाजवळ चार चालकाला भोवळ आल्याने कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट पुलाला जाऊन धडक दिली. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

  • Sulax 1
  • advt tsh flats
  • spot sanction insta

याबाबत माहिती अशी की, अडावद येथील सुरेश बाहेती हे शैक्षणिक कामानिमित्त मुलगा कृष्णा आणि मुलगी पायल सोबत कार क्रमांक एमएच 41 सी 2701 ने जळगावला आले होते. काम आटोपून अडावदकडे कारने पुन्हा परतत असतांना सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास गवळी नाल्याजवळी सुरेश बाहेती यांना भोवळ आली. भोवळ येताच त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले व कार पुलाला जाऊन धडकली. या धडकेले पायल बाहेती हीला डोळ्याजवळ आणि कृष्णा याचा डावा पाय फक्चर झाला आहे. तिघांना धानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारार्थ दाखल करण्यात आले तर पुढील उपचारासाठी जळगाव येथे रवाना करण्यात आले आहे.